Monday, July 18, 2011

manogat

डोक्यात विचारांचे काहूर आणि मनात भावनांचा गोंधळ असला की ,काहीच सुचत नाही . अशीच काहीशी अवस्था माझी काही दिवसांपासून झाली आहे.
खरे तर जय भीम बोलो हे माझे पहिलेच पुस्तक प्रकाशित झाले आणि माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. आता लोकांच्या माझ्याकडून अपेक्षाही वाढल्या होत्या.मी आणखी काहीतरी लिहाव ज्याच्यामुळे चळवळीला एक वेगळी दिशा मिळेल असं काहींच मत होत. नव्हे तर डॉं.धम्मपाल र्त्नाकारांसारख्या साहित्यिक कवींनी, माझ्याजवळ तसे मत व्यक्त केले होते.

Sunday, June 12, 2011

प्रा. डॉ. ज.रा.दाभोळे यांचे मत

बेपर्वाई हा एक भयंकर रोग आपल्या समाजाला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. "जातिसंस्थेचे निर्मूलन' या आपल्या पुस्तकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, ""बेपर्वाई हा एखाद्या देशाला जडणारा अत्यंत दुर्धर रोग आहे. हिंदू इतके बेपर्वा का? माझ्या मते, जातिभेदाचाच बेपर्वाई हा दुष्परिणाम होय. एखाद्या सत्कृत्यासाठीसुद्धा सहकार्य व संघटन या गोष्टी बेपर्वाई वृत्तीने पूर्णत: अशक्य करून टाकल्या आहेत.""(पान नं.66) हे म्हणणे बौद्धांनाही लागू पडणारे आहे. कारण ते सुद्धा अधिकांश प्रमाणात हिंदूच आहेत. "बाहेर बुद्ध आणि घरात खंडोबा' अशी अनेकांची अवस्था आहे. बौद्धांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना होते. तीन अथवा पाच दिवसांची पूजाआर्चा, आरती चालू राहते. त्यानंतर विसर्जनाचा समारंभही केला जातो. याला काय म्हणावे?
       .....परिस्थिती सुधारली तरी खऱ्या अर्थाने बौद्ध बनण्याची हिम्मत नाही. सवलतीच्या तुकड्यासाठी बेपर्वाई वृत्ती जोपासली जाते. बेपर्वाईचा रोग घालविण्यासाठी "कालेन धम्मसाकच्छा" म्हणजे वारंवार धम्मश्रवण करणे अत्यंत आवश्यक आहे. विर्यपारमितेचा विकास करणे आवश्यक आहे. "कुशल कार्य करण्याची जिद्द म्हणजे वीर्य होय.' धार्मिक आचरणातून ही जिद्द वाढविण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी धम्मक्रांतीच्या आचरणाची निवडक सूत्रे स्पष्टपणे सांगितली आहेत. धम्मकार्य, धम्माचे आचरण, समाजकार्य आणि राजकारण करणाऱ्या सर्वच बौद्धजनांनी या सूत्रांप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात सुसंगतपणे कार्य करत राहणे आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्धाने आचारधम्म सांगितला आहे. म्हणून धम्मास अनुसरुन प्रत्यक्ष आचरण करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहात नाही. आयु. सिद्धार्थ कांबळे यांनी या तळमळीतूनच हे पुस्तक लिहिले आहे.
                        प्रा. डॉ. ज.रा.दाभोळे.